Mahanirmiti Bharti 2024 - नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी म्हणजेच Maharashtra state power generation company limited या कंपनीमध्ये नवीन भरती सुरू आहे. सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. या कंपनीमध्ये तब्बल 800 जागांसाठी भरती निघाली आहे. दहावी पास तसेच आयटीआय पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन अर्ज सुरू झालेले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. तसेच वयाची अट 18 ते 38 वर्षे आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे. या भरतीसाठी फी तुम्हाला खुला प्रवर्ग 500 रुपये आणि मागास प्रवर्ग यांच्यासाठी तीनशे रुपये अशी फी राहणार आहे.
एकूण जागा - 800
पदाचे नाव - तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता - कृपया मूळ जाहिरात पहावी
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025